Wednesday, August 21, 2013

अजुन शिर्षक निश्चित नाही... त्यामुळे निश्चिंत

१.

(आज....आत्ता !!! ..... काही क्षणांपूर्वी)

दुपारी १- दीड वाजले असावेत , वातावरण गर्मीचे असले तरी रस्त्यावरची शांतता मनाला थंडावा देत होती. मी ज्या वाटेने जात होतो तिथे रस्त्याला वर्दळही कमी दिसत होती , "नेहमीचा रस्ता गजबजलेलाच असतो....".हातातली सिगरेट विझवावीशी वाटत होती पण एकाच क्रशमध्ये तिचा शेवट होईल असंच वाटलं.....
एका श्वासात सिगरेट ओढली आणि डोळे बंद केले.

नंतर सगळं इतकं विचित्र घडेल ह्याची कल्पना नव्हती....

समोर नुसता धूर - नुसता धूर , अचानक सर्वत्र लाल प्रकाश आणि श्वास गुदमरू लागला....... एखादा स्फोट झाल्यावर जश्या कानठळ्या बसतात तसाच काहीसा आवाज कानी गरजला.......

"माझे डोळे खाड-कन उघडले गेले....." .  सिगरेट फिल्टर पर्यंत संपलेली होती आणि कदाचित माझा वेळही .... तरी सुद्धा मी जीवंत असल्याचा आभास मला अजूनतरी होत होता....

पण माझ्या ह्या आयुष्यात "माझा" असा कधीच उल्लेख झाला नाही वा "माझे" असे कधी अस्तित्व राहिले....
"जगलो" तो फक्त माझ्या आपल्यांसाठीच आणि आता मरेन तेही फक्त.....



( पूर्वरंग )


आयुष्यात जसं सुरळीत घडायला हवं अगदी आपण देवाकडे मागतो त्या प्रमाणेच माझं आयुष्य मी जगत आलो गेली २७ वर्ष. पण मागल्या दोन वर्षांत जे घडलं ते का घडलं ह्यावर नेहमीच डीबेट चालतं माझं बाप्पा सोबत.

२०११ सालची गोष्ट, मी माझ्या आई बांबासोबत मेनरोड ला लागून असलेल्या गणपतीच्या देवळात देवदर्शनास निघालो होतो. सकाळी साडे आठची वेळ दिवस रविवार , रस्त्यावर गर्दी नेहमीच असते मेन रोड म्हंटल्यावर पण आज सगळं काही वेगळंच वाटत होतं. एखाद्या उत्सवी वातावरणासारखं दिसत होतं सगळीकडे त्यामुळे, आई-बाबांना पण देवळात जायची उत्सुकता लागून होती. आम्ही सर्व निघालो... रस्त्याला गर्दी होती गाडी स्टार्ट केल्यावर जेम-तेम १० मिंटांचा प्रवास पार केला असेन एका van ने आमच्या गाडीला ठोकर मारली. पुढे काय घडेल ह्याचा अंदाज न बाळगता आपण आपले जीवन जगत असतो , मीसुद्धा तेच करत होतो पण.....

डोळ्यांसमोर काहीच दिसत नव्हते , काही काळ ऐकू सुद्धा येत नव्हते.... अचानक सर्वत्र आरडा-ओरडी , धक्का बुक्कीचे वातावरण आणि मी रक्तबंबाळ....

" अखेर माझ्या नशीबानेही रंग बदलले......"

त्या दिवसा नंतर माझे आयुष्य देखील बदललं. खरच आयुष्य इतकं पोकळं असतं का ?

                                                               - क्रमश: -

No comments:

Post a Comment