Saturday, March 26, 2016

बदलता प्रवास

तसा खूप प्रवास झाला अात्तापर्यंत पण त्याचा तितका कधीच विचार नाही केला. गरजच नााही पडली कधीच , पण आता वाटतं, करून पहावा एकदा...

हो माझा प्रवास बदलला आहे. ह्यात निरसता नाहीए , उगाचपणा नाहीेए. आत्ता जाणवतंय ध्येय-हीन प्रवास आणि प्रवास ध्येयं आखून केलेला ह्यात काय कमालीचा फरक आहे ते.

प्रवास कोणताही असो सोबती मिळतातच पण कधी कधी तो "सोलो" असणं पण गरजेचं असतं. हरवलेले प्रश्न सापडतात, त्यांची उत्तरं सुद्धा.

अपघाता नंतर गोष्टी बदलतात,खरंच आहे ते. विचार, approach, पद्धती बदलतात किंवा बदलावे लागतात. मला आनंद ह्याचा आहे की हे सगळं मी स्वतः ठरवलं आणि साध्य पण झालं-करतोय-होणार.

आता लवकरच "प्रवाशी" मधून पुन्हा "रायडर" ह्या भूमिकेत येणार... (feeling xcited 😈)

Sunday, March 13, 2016

Dezire....

मनासारखं काहीतरी झाल्यावर खूप बरं वाटतं ना. माझं पण आज असंच काहीतरी झालं.

फोटोग्राफी मनापासून करायचं ठरवलं काय,  dslr  घेतला काय आणि त्यासाठी ट्रेनिंग सुरू केलं काय..

फुल मनासारख्या घटनांची सीरीजच....😏

पण आता पुढचा प्रवास जास्त महत्वाचा असेल , efforts घ्यावे लागतील, मेहनत करावी लागेल आणि ईच्छाशक्ती दाणगी ठेवावी लागेल.

हे सगळं होईल आता कारण सर्व मला हवं तसं आहे. फक्त मनासारखा job मिळाला पाहीजे मग काय मनासारखी पार्टनर पण मिळून जाईल.

dude... youre being tooo dreamy come down on floor 😁

नाही...

ह्या सगळ्या गोष्टी साध्य करायच्या आहेत. त्याची ब्लू प्रिंट नको का...

Tuesday, March 8, 2016

Under Construction...

प्रत्येक ध्येयं साध्यं करण्यासाठी एक मजबूत पाया बनवावा लागतो. मग त्याचं प्लॅनिंग आणि कितीतरी विचार, नुसतेच एखाद्यावेळी सुचुन नको त्या वेळी फुटलेले. मला हे मिळवायचंय , ते करायचंय असं ठरवून टाकतो पण त्यासाठी खरंच गरजे पूरतं तरी काही करतो का ?

अपघात झाल्यापासनं रिकाम्यावेळी ही कामं मी खूप केली , मोडक्या शरीराने. 😁

वाचन-चिंतन ही प्रोसेस असायची. जीवावर बेतलेल्या अपघातानंतर कशाकशाला अंकुश लावायचा ह्याची यादी बनवायचो , नेहमी वेगवेळ्या गोष्टींची. १५ दिवस हेच चाललं पण ठरलं तर काहीच नाही.

There is always a but in everything.. consider butts if you think so much...😂

जेव्हा मी कामावर रूजू झालो तेव्हा मग त्या याद्या डोळ्यासमोर फिरल्या. हल्ली सगळं अगदी peacefully साध्य करता येईल असं वाटतं. मी प्रयत्न देखील करणार आहे.

आता फुसफुसणा-या नळा पेक्षा कमी धारेवरच्या नळावरलं संथ पण मिळणारं पाणी परवडेल.😉

मनासारखे बदल नाही घडले तर मनासारखं होई पर्यंत बदल करत रहावे लागतात..... Really???

मी तर आता ठरवलंय ध्येयं सेट करायचं आणि साध्य करायचं. मला आता कोणालाच काही प्रूव्ह करून दाखवायचं नाहीेए. ठरवायचं आणि मिळवायचं . 😏

Monday, March 7, 2016

अपघाती जगणं

मी बरा होणार....

असं मी आजकल स्वतःला पँपर करत असतो. शरीराने जरी सध्या स्थिर नसलो तरी मनाने आहे. तब्येत सुधारून अश्या खूप गोष्टी आहेत ज्यांना सुधारायची गरज आहे. आता हे पूर्वी सारखं लिहीलेलं शाब्दीक किंवा लिखीत गिरवलेलं काहीसं नाहीए. गोष्टी आता खरंच अमलात येणार ज्या मी ह्यापुढे ठरवणार.

हे सारखे अपघात का होतात ह्याचं मुळ सापडलं की मग त्यानंतरची रिकव्हरी आणि फुकट जाणारा वेळ वाचवता येईल.

हल्लीचा पराक्रम जरा almost जीवावरंच बेतला , पण खूप गोष्टी बदलायला लावणारा आणि नवीन गोष्टी करायला लावणारा असा काहीतरी बरीच लांब वाक्य लिहायला लावणारा झाला..(हुश्श)

नवीन गोष्टी....

आता माझ्यासाठी फ...... से फोटोग्राफी हेच ठरणार आहे. कारण काहीतरी खरंच मनापासून केल्याचं समाधान मला त्यातून मिळणार आहे. ही जिद्द पूरी करण्यासाठी मी आता मनापासून प्रयत्न करणार आहे.
त्यासाठी वेळ काढणार आहे.मला बघायचंच आहेे हा नाद मला कुठंवर घेऊन जातो.

मला पत्रिका...भविष्यं यावर संमिश्र विश्वास होता. कित्येकांनी कायकाय करायला सांगितले आणि मी काहीच केले नाही. हल्लीच गाठ पडलेल्या शास्त्रीजींनी काही उपाय सांगितले त्यातला एक मी चक्कं अवलंबला.....

खडे (रत्नं) त्यांच्या अंगठ्या किंवा लाॅकेट करून घातले तर फरक पडतो आयुष्यात ह्यावंर खरंच माझा विश्वास नव्हता पण... मी त्यावर खूप वाचलं आणि मग ठरवलं बघूया ट्राय करून.

गोमेद घातल्यापासून एक वेगळाच अनुभव येतोय. मी ठरवलेल्या गोष्टी "actually" ठरतायत....

भारी ना....😏

But there is one baggage of disappointments....

मला मिळालेल्या ह्या कॉन्सोलेटरी आरामामुळे अश्या कित्येक संध्या मी घालवल्या...interviews and job openings i mean to say. पण आता मी माझ्यात एक वेगळा आत्मविश्वास निर्माण करतो आहे जो पुनः कधी कमी नाही होणार. आता उशीरा का नाही पण स्वतःची एक अढळ अशी इमेज मला बनवायची आहे.

एक असं target ठरवायचं आहे ज्यामुळे मला भविष्यातील टारगेट्स गाठताना अपयश नाही येणार. ठरवलेल्या गोष्टी साध्य झाल्यावर किती बरं वाटतं हे आता जाणवतंय. माध्यम किंवा त्यांचा आकार लहान असला तरी अनुभव महत्वाचा.

Wednesday, August 21, 2013

अजुन शिर्षक निश्चित नाही... त्यामुळे निश्चिंत

१.

(आज....आत्ता !!! ..... काही क्षणांपूर्वी)

दुपारी १- दीड वाजले असावेत , वातावरण गर्मीचे असले तरी रस्त्यावरची शांतता मनाला थंडावा देत होती. मी ज्या वाटेने जात होतो तिथे रस्त्याला वर्दळही कमी दिसत होती , "नेहमीचा रस्ता गजबजलेलाच असतो....".हातातली सिगरेट विझवावीशी वाटत होती पण एकाच क्रशमध्ये तिचा शेवट होईल असंच वाटलं.....
एका श्वासात सिगरेट ओढली आणि डोळे बंद केले.

नंतर सगळं इतकं विचित्र घडेल ह्याची कल्पना नव्हती....

समोर नुसता धूर - नुसता धूर , अचानक सर्वत्र लाल प्रकाश आणि श्वास गुदमरू लागला....... एखादा स्फोट झाल्यावर जश्या कानठळ्या बसतात तसाच काहीसा आवाज कानी गरजला.......

"माझे डोळे खाड-कन उघडले गेले....." .  सिगरेट फिल्टर पर्यंत संपलेली होती आणि कदाचित माझा वेळही .... तरी सुद्धा मी जीवंत असल्याचा आभास मला अजूनतरी होत होता....

पण माझ्या ह्या आयुष्यात "माझा" असा कधीच उल्लेख झाला नाही वा "माझे" असे कधी अस्तित्व राहिले....
"जगलो" तो फक्त माझ्या आपल्यांसाठीच आणि आता मरेन तेही फक्त.....



( पूर्वरंग )


आयुष्यात जसं सुरळीत घडायला हवं अगदी आपण देवाकडे मागतो त्या प्रमाणेच माझं आयुष्य मी जगत आलो गेली २७ वर्ष. पण मागल्या दोन वर्षांत जे घडलं ते का घडलं ह्यावर नेहमीच डीबेट चालतं माझं बाप्पा सोबत.

२०११ सालची गोष्ट, मी माझ्या आई बांबासोबत मेनरोड ला लागून असलेल्या गणपतीच्या देवळात देवदर्शनास निघालो होतो. सकाळी साडे आठची वेळ दिवस रविवार , रस्त्यावर गर्दी नेहमीच असते मेन रोड म्हंटल्यावर पण आज सगळं काही वेगळंच वाटत होतं. एखाद्या उत्सवी वातावरणासारखं दिसत होतं सगळीकडे त्यामुळे, आई-बाबांना पण देवळात जायची उत्सुकता लागून होती. आम्ही सर्व निघालो... रस्त्याला गर्दी होती गाडी स्टार्ट केल्यावर जेम-तेम १० मिंटांचा प्रवास पार केला असेन एका van ने आमच्या गाडीला ठोकर मारली. पुढे काय घडेल ह्याचा अंदाज न बाळगता आपण आपले जीवन जगत असतो , मीसुद्धा तेच करत होतो पण.....

डोळ्यांसमोर काहीच दिसत नव्हते , काही काळ ऐकू सुद्धा येत नव्हते.... अचानक सर्वत्र आरडा-ओरडी , धक्का बुक्कीचे वातावरण आणि मी रक्तबंबाळ....

" अखेर माझ्या नशीबानेही रंग बदलले......"

त्या दिवसा नंतर माझे आयुष्य देखील बदललं. खरच आयुष्य इतकं पोकळं असतं का ?

                                                               - क्रमश: -